श्रीदत्त माऊली

Started by विक्रांत, February 06, 2013, 12:11:42 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

कृपेची सावलीl l श्रीदत्त माऊली l 

तयास वाहिली l काया माझी ll १ ll

संसारी शिणली l झिजली फाटली l

परी आदरली l तीच प्रेमे ll २ ll

प्रभु कृपा केली l प्रेमे स्वीकारली l

जीर्ण शीर्ण झाली l गाथा माझी ll ३ ll

रस हीन फळ l गंध हीन फूल l

जीवन सफल l झाले आज ll ४ ll

विक्रांत प्रभाकर

http://vikrantchishodhyatra.blogspot.in/
http://kavitesathikavita.blogspot.in/


केदार मेहेंदळे


विक्रांत


Madhura Kulkarni

अभंग वृत्त मस्त जमलंय. मागच्या पेक्षा आत्ता सुधारणा छान आहे. परंतु,

रस हीन फळ l गंध हीन फूल l

जीवन सफल l झाले आज ll ४ ll>>>>> मध्ये 'ल' यमक नाही आले.

विक्रांत

धन्यवाद मधुराजी ,मला वाटते ते आलय .काही वेगळे असेल तर कृपया कळवा .