अरुपाचा खेळ l

Started by विक्रांत, February 06, 2013, 01:46:16 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

भक्तीत भिजल्या l मनात कल्लोळ l 
तेजाचा झळाळ l कणोकणी ll १ ll
आनंदाचा पूर l अष्ट दिश्यांतून l
झाले तनमन l तदाकार ll २ll
काही मिळविणे l बाकी न राहिले l
शब्द हरविले l सांगण्यास ll ३ ll
देहाचिया खोळी l अरुपाचा खेळ l
श्रीदत्त प्रेमळ l दावितसे ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://vikrantchishodhyatra.blogspot.in/


Madhura Kulkarni

जर मी चुकत नसेन तर हा अभंग वृत्त आहे. तसे असल्यास या वृत्तात पहिली, दुसरी व तिसरी ओळ यांत यमक असावे लागते.
कोंडलेला श्वास | ना मुखी घास  ||
म्हणे उपवास | देवासाठी

माझ्या झोपडीत | तेवणारी ज्योत ||
जळणारी वात | देवासाठी


विक्रांत

मधुराजी ,अभंगात दुसरी व तिसरी ओळ यांत यमक असावे लागते. ६ ६ ६ ४ शब्द पहिल्या ओळीत आले तरी हरकत नसते उदा .  स्वरूपानंद स्वामी हि अभंग ज्ञानेश्वरी .
आत्मरुपा तुज । करीं नमस्कार । तुझा जयजयकार । असो देवा ॥१॥
ॐकारस्वरुपा । तूं चि सर्वा मूळ । व्यापोनि सकळ । राहिलासी ॥२॥
सर्व सर्वातीत । तूं चि सर्वात्मक । विषय तूं एक । वेदांलागीं ॥३॥
'नेति नेति' ऐसें । बोलती ते वेद । स्वरुप अगाध । तुझें देवा ॥४॥
जाणावयाजोगा । आपणा आपण । म्हणोनियां मौन । वेदांसी हि ॥५॥
आत्मरुपा देवा । तूं चि गणाधीश । बुद्धीचा प्रकाश । सकलांच्या ॥६॥
आतां ऐका ऐसें । म्हणे श्रोतयांस । निवृत्तीचा दास । ज्ञानदेव ॥७॥

धन्यवाद

Madhura Kulkarni

Ok, by that mean this is good try. Well done!

Ankush S. Navghare, Palghar