समुद्र.

Started by Shashi Dambhare, February 07, 2013, 05:40:14 PM

Previous topic - Next topic

Shashi Dambhare

समुद्र

माझ्या अंगभर नांदत असलेला समुद्र
सरसर रीता झाला ...
किना-यावर मी उभीच
आणि तो परत फिरला ....!
गेला परत तो, आपल्या लाटi मधे विसावला,
माझ्या डोळ्यांच्या देखत ......
माझे रुतलेले पाय,
तसेच घट्ट रुतुन राहीले ..
वाळूत .......!
अर्थात, मी ही त्याला अडवले नाहीच
उतरु दिले तितक्याच वेगाने
जितक्या वेगाने तो चढला होता माझ्यात ..
कारण त्याच्यातले ' वादळ '
साम्भाळून घेईल असा
माझ्यातला 'निसर्ग'
संपुष्टात आलाय , मागील काही दिवसांत .....!

शशी .

केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar

Shashi ji...

माझे रुतलेले पाय,
तसेच घट्ट रुतुन राहीले ..
वाळूत .......!अर्थात, मी ही त्याला अडवले नाहीच
उतरु दिले तितक्याच वेगाने
जितक्या वेगाने तो चढला होता माझ्यात ..
कारण त्याच्यातले ' वादळ '
साम्भाळून घेईल असा
माझ्यातला 'निसर्ग'
संपुष्टात आलाय , मागील काही दिवसांत .....!

Khup sundar oli..
Chan kavita...
.

Madhura Kulkarni

मस्त शशी......खरच छान. निसर्ग आणि मानवी भावनांची सांगड आवडली.
मला पण चार ओळी सुचल्या.......

डोळ्यांतला हा ऋतू पावसाळी
सांग कधी संपेल मजला,
भिजून गेला देह हा
मज भासतो चिंब ओला......

mvd76