बदल

Started by Mangesh Kocharekar, February 09, 2013, 02:42:49 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


          
देवूनी दुखं  त्यांना दुखं मी कुरवाळीते
राहुनी कोशात माझ्या सुखाला झिडकारते
मनाशी जे वाटते त्यासाठी नित्य झुंजते
हाती न माझ्या स्वतःच्य अन्य काही उरते
  माझ्या कृतीत ज्यांना न अर्थ काही गवसतो
  म्हणुनी माझ्या चिंतनाचा आशय हि हरवतो
  मनाशी ठरवते परी कृतीत ते न उतरते
  म्हणुनी माझी प्रतिमा न मनासारखी बहरते
माझे जगणे आता ह्याश्यास्प्द ठरते आहे
माझी योग्य कृती हवेत विरते आहे
  एकांत हवा मजला मलाच समजण्याला
  माझ्यासाठी थोडे मलाच गहिवरण्याला
थांबा तुम्ही जरासे मी स्वतः बदलत आहे
जे रूप तुम्हा गमेल त्यास घडवत आहे 
    विश्वास थोडा ठेवा तुम्हासही वाटेल हेवा
    माझ्या कृतीवरी नसेल कुणाचा दावा
                      मंगेश कोचरेकर