ग़झल - दुखांचे सोहळे

Started by satish-Aman, February 12, 2013, 04:10:18 PM

Previous topic - Next topic

satish-Aman

गुंतले , तुटले , जुळले सतत काही तरी शोधत राहिले ,
शब्द माझिये हे मनाच्या गावात एकटेच फिरत राहिले .

भेदिले काळजाला तारकांच्या अश्या ह्या वागण्याने ,
स्वप्न दाखविले मज अन स्वतः आभाळ बदलत राहिले .

गात्रे गात्रे  झंकारली अंतरीच्या अधीर मुक्या सुरांनी,
रंग बदलून बदलून स्वर जीवनाच्या मेफिलीत राहिले .

मज एकटेच गाठून दुखांनी केले  आज सोहळे साजरे,
विजा चमकत राहिल्या अन  ढग  बरसत  राहिले.

नशा चढलि होती मज आज दुरावलेल्या स्वप्नांची ,
एक एक स्वप्न आज टिपूर चांदण्यात उतरत राहिले .

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

छान प्रयत्न होता गझलेचा.