स्वप्न

Started by Mangesh Kocharekar, February 16, 2013, 03:14:27 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

      स्वप्न  मला वाटले तू अशीच आहेस चैत्रातल्या चांदण्यासारखी [/color]
कुठेही न गुंतता आनंद वाटत फिरणारी निशब्द ,अबोल
आपल्यात साम्य आहे मलाही आवडतो शांत एकांत
फक्त पाहत रहाव कशचीच तेव्हा असू नये भ्रांत
      मी तुला हेरलं अन शिकार करण्या एवजी झालो जायबंदी
      माझ्या प्रेमाचा पाढा तुजजवळ तू नेहमी स्वप्नात उभी
       माझ हरवल्यागत वागण अन बोलन ज्यांनी अनुभवल
       माझ्या विरहाच्या वेदनेच दुख त्यांनाच फक्त कळल
मलाच काळात नव्हत हे अस होन म्हणजे नक्की काय
भूक मारते तहान हरपते वेगळ्याच भाव विश्वात मन हरवते
माझीच मी समजूत घातली एव्हड गुंतून घेण बर नव्हे
जे स्वप्नात दिसते ते सारे सत्य समजणे खरे नव्हे
        कोण? कोठली?भास कि आभास ,त्याचा त्याचा एक प्रत्यावार्त
        पण मन मानत नव्हत ,ते थारयावेर तिच्या भेटीनंतर  कधीच  नव्हत
        जागेपणीच स्वप्न ,स्वप्नात ती ,त्या पुढे ती आणि तीच
         झपाटलेपणे रोज दिवस संपत होते ती होतीही तशीच
रोजच आम्ही भेटत होतो निशब्द डोळ्यांच्य पाप् ण्यातून
मिलनाचा रोजच सोहळा सजत होता मनाच्या गाभ्यातून
तीच  हसण पाहावं  हेच माझ स्वप्न मी सांगितल ओठांतून
ती शुभ्र दंतपंक्ती दाखवत बागडली गोबर्या गालातून
         एके दिवशी एका गाडीखाली रास्त ओलांडता ती सापडली
         तेव्हा ती निस्तेज्पणे म्हणाली गड्या मी पहा निघाली
         तुला छलन्याची  शिक्षा मला तुझ्या समक्ष मिळाली
         मी तिला रागावून म्हणालो मला एकट्याला टाकून चाललींस
माझ्या मांडीवर डोके अन शरीराच्या चिंध्या तरी डोळे हसले
तिचे ते हसणे माझ्या काळीज चिरत मला बधिर करून गेले
अखेर माझे तिचे मन चोरण्याचे स्वप्न ,स्वप्नच बनून राहिले
आजही आठवण आली कि कंप पावते शरीर अन डोळे होती ओले
                           मंगेश कोचरेकर

Madhura Kulkarni