मी .....योनी .................

Started by SANJAY M NIKUMBH, February 18, 2013, 08:06:06 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मी .....योनी .................



मी योनी

स्री शरीरातील

अविभाज्य भाग

जन्मतःच

इतरांसारखाच

असलेला एक अवयव

फक्त मी आहे म्हणून

कधी गर्भात

तर कधी जन्मल्यावर

मला मारलं जातं

कितीही असो माझं वय

मी भोगीच

अजाणताही मला

भोगलं जातं ..................

वयात आल्यावर

मासिक पाळीच्या रुपानं

मी बहरते

तेव्हा त्या तीष्ण नजरा झेलत

मला जगावं लागतं

ज्या स्री शरीरात असते मी

तिच्याही तिरस्कारास

सामोरं जावं लागतं

कारण मी आहे म्हणून

तिला खूप सोसावं लागतं ........

पण मलाच तर मिळालंय

नव - निर्मितीचं वरदान

माझ्याच गर्भात फुलतो जीव

मग मी घाणेरडी कशी ?

कां मासिक धर्माच्या वेळी

माझ्यामुळे

स्रीला बाजूला टाकलं जातं

कुठल्याही धार्मिक विधीच्या वेळी

कां तिला वगळल जातं

मी आहे म्हणून तर

स्री आहे

अन मनुष्य जात आहे

जशी पुरुषाला असते चुन्नी

तशीच स्रीलाही

मग स्रीच कां नको ?

कां मला झाकलं जातं

माझ्या विषयी बोलणही टाळल जातं

मीच कां अस्पृश्य 

याचं उत्तर मी कुणाकडे मागायचं ?

मनुवाद्याकडे की समस्त पुरुष जातीकडे

कुठल्या धार्मिक ग्रंथास

कि मी नकोशी वाटणाऱ्या स्रीकडे ?

मलाच माझं उत्तर मिळून गेलंय

मी आहे म्हणून

नव निर्मिती आहे

मग मी कां मला कुरूप समजू

हे पुरुषा तुला कधी कळेल

मी हि सुंदरच आहे

माझ्या सौंदर्याची जाणीव

झालीयं मला आज

म्हणून मी योनी आहे याचा

मला अभिमान आहे .

                                          कवी : संजय एम निकुंभ , वसई

                                       दि . १८.०२.२०१३  वेळ : ७.१५ संध्या .