इ.स.१९३३ मधील आजच्या दिवशी म्हणजेच "शिवजयंतीच्या” निमित्ताने”

Started by Sadhanaa, February 19, 2013, 09:07:45 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

इ.स.१९३३ मधील आजच्या दिवशी  म्हणजेच  "शिवजयंतीच्या"  निमित्ताने" साहित्याचार्य न.ची.केळकर ह्यांच्या हस्ते इतिहासकार बेंद्रे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे खुरे चित्र समाजापुढे आणले .लंडन मधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली होती. अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक बहुमोल ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र "शिवाजी महाराजांचे" चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते .या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते.ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते. त्यात व्हैलेनट्यीन ह्या दुच गव्हरनरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले. इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले.इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली.ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे "इब्राहिमखान"पुस्तकातून हटला गेला.बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासविषयक पुस्तकातून आणि घराघरातून झाली.शिक्षण संस्थांनाच काय पण शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या चित्र मागील अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नरचे लेखन याची माहिती नसेल. ह्या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे ह्यांची एक अतिशय महत्वाची कामगिरी मानावी लागेल.पुढे श्री बेंद्रे ह्यांनी ह्या चित्राच्या प्रसारास प्रारंभ केला. चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी इंडिया हाउस कडून परवानगी मिळवली.सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना केली.इ.स. १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्याचार्य न.ची.केळकर ह्यांनी हे चित्र समाजापुढे आणण्यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजला.तेथे या चित्राचे समारंभपूर्वक प्रकाशन केले. ह्या निमित्ताने हे चित्र केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषेतील वृत्तपत्रांकडेही प्रसिद्धीसाठी पाठविले गेले.वृत्तपत्रानीही व्हैलेनट्इनच्या पत्रासह या चित्रास प्रसिद्धी दिली.त्यामुळे निदान महाराष्ट्राच्या कानाकोपर्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे चित्र जाऊन पोहचले.याचे सर्व श्रेय श्री वा.सी.बेंद्रे ह्यांनाच जाते. तेव्हा व्हैलेनट्इनच्या संबंधातील शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यासंबंधीचा लेख(पत्र )  प्रसिद्ध करून श्री वा.सी.बेंद्रे यांनी अत्यंत महत्वाची कामगिरी केली व मराठ्यांच्या इतिहासाला तितकेच मोलाचे योगदान दिले हे मान्य केले पाहिजे.
Please click on this
http://historianbendrey.blogspot.com/2013/02/blog-post.html