!! तू "इश्य" म्हणून !!

Started by Amey Sawant, February 19, 2013, 07:33:40 PM

Previous topic - Next topic

Amey Sawant

नजरेला नजर भिडली असताना,
            अचानक तुझी नजर का झुकावी...
संवादाद मग्न असताना,
            शब्दांनी तुझी साथ का सोडावी !!!

आत्ताच का त्या बेभान वाऱ्याला कळ यावी...
            कि त्याने ती केसांची लट,
तुझ्या चेहऱ्यावर अलगद लहरावी !!!

तू "इश्य" म्हणून, <3
            या क्षणाला स्त्री वरचा दागीना बनवावं...
टाचणीच्या टोका एवढ्या त्या क्षणाला,
            मनात मी कुठेतरी दाटून ठेवावं !!! <3

.............................................................amu♥♥♥

Saturday, 7 April 2012

केदार मेहेंदळे