श्रीदत्त नामाचे

Started by विक्रांत, February 19, 2013, 09:58:22 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

श्रीदत्त नामाचे l निधान भेटले l जीवास लाभले l महासुख ll १ ll
कैवल्य सुखाचा l महापूर आला l देहीच पहिला l निर्विकार ll २ll
श्वास प्रश्वासाच्या l जपे अनुष्ठिला l हरवूनी गेला l पाहणारा ll ३ ll
शून्याच्या गाभारी l चैतन्य पुतळा l पहिला मी डोळा l अनुपम्य ll ४ll
भाग्याचा सोयरा l जाहलो सहज l गेली गजबज l भवचिंता ll ५ ll
जाहले कल्याण l माझिया जन्माचे l परत येण्याचे l नुरे काज ll ६ ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे