जीवन-जगतो तुझ्याविन

Started by Sadhanaa, February 20, 2013, 08:30:34 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

जीवन जगतो तुझ्याविन 
एकला एकाकी दुःखात
रात्र परि उडून जाते
स्वप्नीं तुला पाहण्यात ।

श्वासासंगे आठवण येते 
तुझ्या हृदय स्पंदनाची
हळूंवार ही झुळूक संगे 
तुझ्या कोमल स्पर्शाची ।

कंठातून ते शब्द निघतां 
नांव तुझे ओठीं येते
कानीं अन स्वर ते पडतां 
तूं मारली हांक ऐकू येते ।

वेळी अवेळी भास होतो 
तुझ्या प्रेमळ सान्निध्याचा
आवरतो न मोह मजला 
कवटाळून तुज घेण्याचा ।

अचानक उठतो हात माझा 
हांत तुझा धरण्यासाठी
आतुरतेने अन मन माझे 
तुझ्या मादक स्पर्शासाठी ।

राहतो परि हात नुसता 
हवेंत तो वरच्या वरती
अनामिक अन दडपण  येते 
दुखावल्या मम मनावरती ।

क्षणांत आठवते  माझे मला 
साथ सोडली तू अचानक
आणि घालवितो पुढचे 
दुःखांत क्षण एक एक ।

आतां फक्त आठवणीवर 
उरले जीवन जगायचे
अन एकाकी जगून 
मातीत मिळून जायचे  ।।
                        रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/love-poem_11.html



Ankush S. Navghare, Palghar


मिलिंद कुंभारे