*** प्रेम धून ***

Started by SANJAY M NIKUMBH, February 20, 2013, 10:18:01 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

*** प्रेम धून ***

तिचीच जादू असते

सतत माझ्या मनावर

मन झुलत असते

सदा प्रीत झुल्यावर

शीळ वाजवत फिरतो

या उनाड वाऱ्यावर

तिचेच गीत ओठी

उमली तार छेडल्यावर

तिचच राज्य असतं

माझ्या या जगण्यावर

श्वासही लुब्ध होतो

फक्त तिच्या गंधावर

तिचच नाव कोरलंय

मनातल्या प्रितीवर

ती प्रेम धून आहे

तिचाच हक्क काळजावर .

कवी : संजय एम निकुंभ , वसई

दि. १८.०२.२०१३ वेळ : ११.१५ स .