मी मराठी

Started by Vikas Vilas Deo, February 23, 2013, 06:58:10 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

मी मराठी,मी मराठी,होय मी मराठी!
मी मरायलाही तयार आहे मराठीसाठी.

morningची सुरुवात good morningने होते,
हिँदी भैया मिल्या की  हिंदीमध्ये बातचित होते.
Nightमध्ये dreamसुद्धा मराठी पडते.
हिँदितच बोलतो जरी मला भेटला मराठी.
असा मी मराठी मी मराठी....

माझे children conventमध्ये शिकतात.
आई बाबा नाही mumy pappa म्हणतात.
मला कळत नाही zpच्या शाळा का emptyअसतात.
मी नक्की काही तरी करणार मराठी शाळांसाठी.
असा मी मराठी मी मराठी....

मी मराठी englishमध्ये बोलतो.
प्रत्येक वाक्यात english word घालतो.
लोक म्हणतात मी englishच बोलतो.
असे म्हणणार्याला देईन मी काठी.
असा मी मराठी मी मराठी....

wifeमाझी upto date madam.
मी पण असतो english gentelman सम.
englishमध्ये लिहीतो माझे name.
special cakeची order असते birthdayसाठी.
असा मी मराठी मी मराठी....

छाती ठोकून मी सांगणार
यस आय अॅम अ मराठी (अमराठी)!

Madhura Kulkarni

हि मराठीची खिल्ली उडवली आहे. निषेध! निषेध!! निषेध!!!

MK ADMIN


हि मराठीची खिल्ली उडवली आहे. निषेध! निषेध!! निषेध!!!

  विडंबन कविता mhantat yala :) Take it sportingly.

Madhura Kulkarni



हि मराठीची खिल्ली उडवली आहे. निषेध! निषेध!! निषेध!!!

  विडंबन कविता mhantat yala :) Take it sportingly.
No. I don't think so. Marathivar vidamban karanyacha adhikar nahiye konala.  >:(

Pandurangraja

Jay Maharashtra.  Marathichi laj vatu naye bt kavita mast

मिलिंद कुंभारे

खरोखरंच हि विडंबना आहे! आपण मी मराठी मी मराठी स्वतःला नेहमीच मिरवत असतो!
पण zee मराठी channel वर सुंदर अन अप्रतिम धारावाहिक सुरु असताना आपण zee हिंदी वर "पवित्र रिश्ता" च धारावाहिक बघत असतो!
विडंबना असली तरी मला कविता अन त्यातून मराठी माणसाला केलेले प्रबोधन आवडले!

मिलिंद कुंभारे  :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'( :'(

अभिलाष

झाली मराठीची खिल्ली
म्हणून रागावली एक बिल्ली
कवीने तिला लावली किल्ली
की मराठी लोक बोलतात "मिंग्लिश" हल्ली
रहायचे गाव असो कुठलेही - पुणे, मुंबई, किंवा दिल्ली.
"खिल्ली करणारी मराठीची आहे ही कोण वल्ली?
केली की तिने मराठीची पार पायमल्ली!"
- केला निषेध बिल्लीने जाऊन गल्लोगल्ली.

Madhura Kulkarni

#7
@अभिलाष:

गाढवाचे बोलणे हे
घ्यावे लागते ऐकून,
काय उपयोग आहे
निर्बुद्धाला समजावून? ? ? ?

>:(   >:(   :o   :-[  >:(  >:(

कवि - विजय सुर्यवंशी.

#8
"पाहुनी झालेला मराठीवर घाव....
मधुराजी चांगलंच पेटलाय की राव....
कविही आहेत चिडीचुप येथे....
परी आपल्या चारोळीचा होता भलताच ताव....
I don't know how....
but your निषेध was just wow...."

Madhura Kulkarni

@विजय सुर्यवंशी: 

माझ्या मराठीचा मान,
अवघ्या महाराष्ट्राची शान,
आणेल समाजाला भान,
असेन जरी किती सान!!

मायबोलीचे गुणगान होsssss जी जी जी जी जी !!!