ज्ञानेश्वर

Started by kumudini, February 25, 2013, 07:44:25 PM

Previous topic - Next topic

kumudini

ज्ञानेश्वर
कुमुदिनी काळीकर

नकोच मजला कशी अन नकोच रामेश्वर
पुण्यक्षेत्र हे माझ्यापाशी माझे पंढरपूर

विश्वेश्वर हा इथे सावळा उभा विटेवर
चन्द्रभागा ही गंगा वाहे त्याच्या चरणावर
वनी जाऊनी राखीतसे हा चोखोबाची गुर
गोरोबाच्या मडक्यांना देतो आकार

नित्यच असते मायापाखर भ्क्तच्यावरी
बोरू होऊनी ज्ञानेशाची लिहितो ज्ञानेश्वरी
नामाचाही हट्ट पुरवितो चाखुनीया ख्रीर
भक्तासाठी सिद्ध विठोबा ठेऊनी कटी कर