असं हे आयुष्य ....

Started by Er shailesh shael, February 25, 2013, 07:51:56 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

अपेक्षांच्या पुरात अनेकदा आपले स्वप्न वाहून जाते
आपण श्वास घेत राहतो फ़क्त पोहायाचे मात्र राहून जाते .....
असं हे आयुष्य ...
कधी अवघड वळणाचं तर कधी सरळ मखमली वाटेचं.
त्यावरून चालताना अनेकदा अड़खळायला होतं ...
नात्यांचं ओझं जड़ होउन दमायला होतं ...
वाटतं नको हा प्रवास नको ती वाट
नको ते स्वप्नांचे देखावे अन नको तो खोट्या आशेचा थाट...
पण तरीही तोल सावरून पुढे जावं लागतं ....
नाही जूळले सुखाशी आपले सुर तरीही जीवनगाणं गावंच लागतं
असं हे आयुष्य ....
इथे सगळ आपलं आपणच बघावं लागतं ...
सोबत कुणी असो वा नसो निमूटपणे जगावंच लागतं ,..........
------पाउसवेडा.

Ankush S. Navghare, Palghar

Shailesh ji khare ahe ekadam. Chan kavita ahe.