कशाची उपमा देवू तुजला आई

Started by Vikas Vilas Deo, February 26, 2013, 07:49:29 AM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

कशाची उपमा देवू तुजला आई ।
तुझ्या समान जगात कोणीही नाही ।।

अमृत तुजला म्हणू कसे,
अमृतापेक्षा ही जास्त गोडी तुझ्या वाणीत असे.
अमृतासम तू काल्पनिक नाही ।।

तुझ्या प्रेमाची किँमत जगात कोण करू शके,
हिय्राचे मोल ही तुझ्या प्रेमापुढे बेमोल ठरे.
तुझे प्रेम कशातच तोलता येत नाही ।।

कल्पतरू मागितल्या वरच देतो,
कामधेनू ही तेव्हाच देते जेव्हा शब्द ओठी येतो.
तुला मागण्याची कधी गरजच भासत नाही ।।

स्वर्ग सुखही तुझ्यापूढे पडते फिके,
स्वर्गाचे दार तुझ्या चरणी झुके.
तुझ्या वात्सल्याची सावली स्वर्गात नाही

देवही तुझ्या पुढे फिके पडतात,
तुझ्या प्रेमासाठी देवही धरतीवर अवतरतात.
देवही तुजला पुजीत राही ।।


Sunita Gaikwad



मिलिंद कुंभारे