विसावा

Started by kumudini, February 28, 2013, 09:34:57 PM

Previous topic - Next topic

kumudini

विसावा
कुमुदिनी काळीकर

शाल निळ्या आभाळाची
पांघुरून धरा झोपली होती
चंद्रकोर आभाळाची अंगाई
तिजला गातच होती
त्यां मंद समीरची
साथही तयाला होती
हलकेच हलुनी वेली
कुरवाळीत तिजला होती
ती क्लांत शांत धरित्री
सुख स्वप्ना पाहत होती
अरुणाच्या किरणांनी
उजळली जेधवा प्राची
सुस्नात होऊनी धरती
सामोरी त्याला गेली


केदार मेहेंदळे