!! दुरून तुला पहायचो मी रोज !!

Started by Chetan Thakare, March 01, 2013, 09:39:07 PM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

दुरून तुला पहायचो मी रोज
सगळ्यांच्या घोळक्यात तुला शोधायचो मी रोज ....

एका अभेद्य पडद्यात राहायची तू रोज ...
खाली मान घालून जायची तू रोज ....

तू कधीच हसली,बोलला नाहीस पण कधी
तुझ्या स्वप्नात असायचो का मी रोज ?

कधी दिवस कधी रात्र जागायचो मी रोज ...
एकांतात शब्दाबरोबर खेळायचो मी रोज ...

मी तुझ्या डोळ्यात मला शोधायचो रोज .....
पण कोणा दुस-याचेच प्रतिबिंब दाखवलेस तू एक रोज —
                                                                         : author unknown