काटे

Started by Mangesh Kocharekar, March 02, 2013, 03:20:33 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


       काटे
मना टोचले काटे परी मी रडले नाही
ना विदीर्ण र्हीदय झाले मी बिघडलेच नाही
   पाषाण र्हीदय म्हणुनी मज संबोधले त्यांनी
   शाब्दिक करुनी जखम उद्धरले बघ्यांनी
परी बिथरले नाही न प्रहार उलट केला
भोग प्रारब्धाचे मी समजावले मनाला
      पाहुनी टकमक मजला कुणी थुंकले उभ्याने
     परी मी स्वतःशी हसले घडते नव्या दमाने
झटकुनी भोग पुन्हा भोगते नव्याने
जगणे असेच रुचते जाणीवेत कल्पनेचे
   का दुख मज न ठावे मी सखास काय भ्यावे
   अनोळखी जगाला मी क्काय म्हणुनी भावे
   
             मंगेश कोचरेकर