माणसे अशी.

Started by pralhad.dudhal, March 02, 2013, 03:46:01 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

माणसे अशी.

अशी काही नको नको ती, भेट्तात माणसे.
जगण्यातली मजा ती घालवतात माणसे.

उभा जन्म खाण्यासाठी, जगतात माणसे.
दात कोरूनही पोट ती भरतात माणसे.

आयुष्य सारे पॆशासाठी, वेचतात माणसे.
गच्च ती तिजोरी उपाशी मरतात माणसे.

जन्म मानवाचा व्यर्थ दवडतात माणसे.
माणुसकीला बदनाम करतात माणसे.

अशा पुंगवांना कसे हो म्हणावे माणसे?
पुरा जन्म पशूसारखे वागतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.
9423012020.
www.dudhalpralhad.blogspot.com
काही असे काही तसे!

केदार मेहेंदळे


pralhad.dudhal