जनरेशन ---ग्याप

Started by kumudini, March 02, 2013, 05:24:18 PM

Previous topic - Next topic

kumudini

जनरेशन ---ग्याप
कुमुदिनी काळीकर

आजीची नात विदेशातून आली
आजी आनंदाने मोरपीस झाली
लाडू वळले चकली तळली
कपाटात खाऊची गर्दी झाली
ठरल्यावेळी नात घरी आली
अलगद आजीच्या कुशीत शिरली
आजीचे हात हातात घेतले
आजीचे हात क्रीम सारखे मऊ
आले आजीला क्रीम नाही कळले
पण डोळ्यातले भाव उमगून आले
चकली खाऊन म्हणायला लागली
कबाबची टेस्ट मस्तच झाली
लाडू होता वाटीत बसला
खाऊन म्हणाली स्वीट बाल खूप आवडला
पुरणाच्या पोळीवर तुपाची धार
स्वीट सांद्विच्च टेस्टी फार
जायचा दिवस जवळ आला
सैरभैर भावना आजीच्या झाल्या
डोळे पुसत नात म्हणाली
आजी डोन्ट क्राय
आय विल सी यू अगेन
तिच्या आठवणीत आजी रंगली
जनरेशन ग्याप अपोआप गळली


केदार मेहेंदळे