आम्ही एकटेच बरे!

Started by Madhura Kulkarni, March 02, 2013, 06:28:25 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

खोट काही बोलत नाही,
बोलतेय एकदम खरे
खर-खर सांगते ऐका,
आम्ही एकटेच बरे

प्रेमात पडून होतो
साऱ्यांच्याच लोच्या
लग्न-लग्न करणाऱ्यांचा
बनून जातो चोच्या

एकसारखा तुरुंगवास
हवाय तरी कशाला?
रहाव मस्त मजेत
नको घोर जीवाला....

उगाच पडतात प्रेमात
आणि होतो प्रेमभंग
दुखा:त जगतात उगा
जीवन होते बेरंग

आकाशातल्या पक्षांना
नको कोंडणारे पिंजरे
खर-खर सांगते ऐका
आम्ही एकटेच बरे.


:D  :D  :D   :P

केदार मेहेंदळे

#1
ha ha ha.....

Madhura
mala mahitey ki hi vinodi kavita aahe. hya varun suchlelya oli mi charolyan madhe post kelyaa aahet.



मिलिंद कुंभारे

आकाशातल्या पक्षांना
नको कोंडणारे पिंजरे
खर-खर सांगते ऐका
आम्ही एकटेच बरे.

छान आहे कविता! :) :) :)