“शब्द घेवून माझे”

Started by eknatha@rediffmail.com, March 02, 2013, 10:34:02 PM

Previous topic - Next topic

eknatha@rediffmail.com

"शब्द घेवून माझे"


शब्द घेवून माझे बोल मला देवू नकोस
गुन्ह्या साठी त्यांच्या शिक्षा मला देवू नकोस
तेही स्विकारीन तुझ्या साठी
प्रेम देवून मात्र त्यांची होवून राहू नकोस

आसूस ला जीव माझा कंठ दाटला ओढी ने
तगमग जाणून माझी, तू खुशीत येवू नकोस
याचकाचे भाव माझे, तुझा मात्र विरंगुळा 
आनंद माझा झाला सोवळा, तू सजवलास त्यांचा सोहळा?

भूललीस त्यांच्या देखाव्याला
सत्व असते साधे पणाला
कळणार तुला कसे
वेड असते भोळे पणाला

फसलीस जरी, एकटे वाटून घेवू नकोस
वेदना तुझ्या, कळा हृदयी उमटवू नकोस
वाट पाहीन क्षया पर्यन्त
यायची मात्र विसरू नकोस

शब्द घेवून माझे बोल मला देवू नकोस....

-रमाकांत