हत्या !

Started by swatium, March 03, 2013, 12:32:32 AM

Previous topic - Next topic

swatium

मस्तकातून शब्दांचे
हृदयातून भावनांचे पेव फुटते
अवघ्या देहातून
चांदणे पाझरते
कवितेचा चंद्रोदय होऊ पाहतो
इतक्यात
दिगन्तरातून
रखरखीत रेतीचा मारा होतो
कायेचा वाळवंटी ढिगारा
आणि ..एका नवागत ओल्या
अनाघ्रात कवितेची अर्थातच ..हत्या !
.....................................स्वाती मेहेंदळे (एक भिजले वाळवंट )