इथेही एक चंद्र राहतो…

Started by वैभव कसुर्ड़े, March 04, 2013, 03:09:50 PM

Previous topic - Next topic

वैभव कसुर्ड़े

चंद्र खिडकीतून डोकावतो
बघ, तो तुलाच पाहतो...
त्याला मीच सांगितलंय,
इथेही एक चंद्र राहतो...

आहेत त्या चंद्रावर डाग अनेक,
पण माझ्या चंद्रावर डाग नाही... 
आहे तो खूप दूर सगळ्यांपासून,
पण माझा चंद्र माझ्यापासून दूर नाही...

म्हणूनच तर तो तुझ्यावर जळतो
कारण,
त्याला मीच सांगितलंय,
इथेही एक चंद्र राहतो...

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे



Anan.mhatre