चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Amey Sawant

शरदाचं चांदणं !!

विचारांच्या अंधारात चांदोबाला शोधणं...

तो गवसला कि एकटक त्याला पाहणं !!!

अचानक जाग येताच, फुटक्या चेश्म्याने परत चाळणं...

ते मनात भरलेलं, शरदाचं चांदणं !!!

................................................amu♥♥♥ - प्रेरणा - संदेश प्रताप, AAM

Wednesday, 18 April 2012

Madhura Kulkarni

अमेय दादा, स्वागत आहे आमच्या कवितांच्या भेंड्यांमध्ये.

चांदण नभीच,
पाण्यात उतरल,
वाहुनिया आल

माझ्या ग घागरीत.....

शोधे चांदण्यांना
चंद्र हि वरून,
पाहतो डोकावून

माझ्या ग घागरीत......

Amey Sawant

पाहतो डोकावून

माझ्या ग घागरीत......mastach :)

केदार मेहेंदळे

उजळत्या पूर्वेची
चंद्राला भीती
बघून घेतो पृथ्वीला
सूर्य यायच्या आधी  ::)


केदार...............

केदार मेहेंदळे

mdhura

tujyha ghagritlya chandanyanvarun ek kavita suchali aahe. udya post karin.....
ani chandr pruthvi varchya tyjhya charolicha reply kasa vatala te kalav. :)

Madhura Kulkarni

#15
अमेय दादा,

धन्यवाद!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


केदार दादा,

तुला माझ्या ओळींवरून काही दुसऱ्या ओळी सुचतात, म्हणजे म्हणजे माझ्या कविता तुला आवडतात. त्या बद्दल धन्यवाद!
बाकी तुझ्या चंद्र आणि पृथ्वी वरच्या ओळी कश्या झाल्यात, हे सांगायची गरजच नाही.........पण तरीही, तू विचारलस म्हणून...... "झक्कास"!

Amey Sawant

kedar ji..mastach ahe...chan kalpana

Madhura Kulkarni

अमेय दादा,

भेंड्या सुरु ठेवूयात.


बाण शब्दांचे
खोल रुतले उरी
डोळ्यांतूनी
बरसल्या सरी

Amey Sawant

शब्दांनी गुंतवलं,
विचारांनी थकवलं !
पुढे जगायचं,
म्हणून स्वतःला बदललं !!-amu♥♥♥

Wednesday, 13th March 2013.

akash raut

premat ase ka ghadate,
kuni padate ,kuni adakhalate,
chahul manachi khoti,
fasavihi jadu karate.

@xs........ :)