चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना
शब्दांत त्या मांडू कशी
वेड्या मना मज सांग ना.....

केदार मेहेंदळे

घे समजूनी सख्या रे
मूक भावना नजरेतल्या 
उधळते  तुजवरी सख्या रे
कळ्या अबोल प्रीतीच्या  :)

Madhura Kulkarni

रात्र आज एकटी
चंद्रा लागता ग्रहण
रातकिड्यांचे किरकिरणे
करते ती श्रवण .....

केदार मेहेंदळे

लपुनी ढगा आड तो
हळूच बघतो ............................वसुंधरेला
भासे तिला जणू लपला ..............चंद्र
ढगांत बनून कृष्ण सावळा  
 

केदार.... :)

swapnil nagre


Madhura Kulkarni


Madhura Kulkarni

#6
Kedar dada,
आता माझ्या ओळी.

पांघरून हिरवळ भवती
चंद्राला म्हणते धरती
आकाशीचा थाटलेला
खोटा तुझा साज
दिवसा मात्र विरून जातील
चांदण्या धोकेबाज

केदार मेहेंदळे

चांदण्या झुरती चंद्रा साठी
चंद्र झुरतो  पृथ्वी साठी
चांदण्यांवर पृथ्वीचा आकस
चंद्र बिचारा  पृथ्वीसाठी बेबस

केदार....

Madhura Kulkarni

वाह...वा!

झाडाच्या सावलीत धरती,
पांघरून हिरवळ वरती,
चंद्राला बघ म्हणते,
का घालतोस घिरट्या भवती?

:D

Amey Sawant