** शापित **

Started by SANJAY M NIKUMBH, March 05, 2013, 10:40:24 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

  **  शापित  **

'''''''''''''''''''''''''''''''''

कुठल्याही वयानं

मी शापित

जन्मताच

वाट्यास भोगवटा जन्माचा

फुलपाखरासारखं

स्वच्छंदी जगण्याचं स्वप्न

मन अजाणतं

अनोळखी जगात हुंदडणार

कुणाच्या मोहापायी

मी कुस्करली जाते

गावाच्या कुठल्याशा

डोहात , झुडपात

घरातही गाडली जाते

विझलेल्या अंगासह

जाळली जाते

मी हि शांत

तो हि शांत

पाठमोरा .

कानी जन्मदात्यांचा आक्रोश

त्याला पुन्हा पाहते

नव्या फुलपाखराकडे झेपावतांना

जगलेच तर

फुलपाखरासारखं  उमलत

जाणिवेशी ओळख होते

कुणाचा स्पर्श

मनास शिशारी आणणारा

अंगाचा थरकाप उडवणारा

वस्राच्या आंत डोकावणारी

कुणाची विषारी नजर

मनावर ओरखडे उमटवणारे

शब्द झेलत

अंधारात कायं

उजेडातही

केव्हा डोकावतील नखं श्वापदांची

रक्त बंबाळ करणारी

सतत भय भाळगत जगायचं

मात्र अवचित पावसासारखा

कुणाचा मायेचा स्पर्श

आपुलकीचं प्रेम

उराशी बाळगत

जगण्याला सामोरं जायचं

हसत हसत .

पण आता

पापानं बाहू सरसावलेत

ते गिळंकृत करू पाहतंय

सारी कोवळीक .

काल फक्त परक्यांचीच

भिती बाळगत जगणं होतं

पण आपल्यांच्या

नकोशा स्पर्शानं

काळीज चीरणाऱ्या नजरेनं

मन गोठून जाते

आधारवड हरवलाय

कुठेतरी

कालच पेपरात वाचलं

एका जन्मदात्यानं

कळीला कुस्करल्याच

शेवटचा आसराही

संपण्याच्या मार्गावर

निखाऱ्यावरच मन

झालंय निराधार .



                                  कवी : संजय एम निकुंभ , वसई

http://www.facebook.com/SanjayNikumbhPoems?ref=hl