कुणासोबत करू नकोस...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 05, 2013, 11:18:03 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आज तू नसताना
सतत तुझी आठवण येते
तुझी आठवण मला
भूतकाळात घेऊन जाते
तिथे मी होतो
तुही होतीस माझ्यासह
कुणीच नव्हते दुसरे
आपण आणि आपलेच जग
किती रमलो होतो आपण
विसरून साऱ्या जगाला
किती प्यायलो होतो
आकंठ त्या प्रेमाला
पाहता पाहता दिवस
जात आणि येत होते
काय माहित काळाच्या
पडद्यामागे काय होते
अचानक आले कुठून
वादळ एक जोराचे
वाहून गेले आपले
घरटे सुंदर प्रेमाचे
आता वास्तव हेच
फक्त उरले आहे
प्रेमाचे तर जाऊद्या
दुखही मेले आहे
आधी अश्रू होते
माझी साथ द्यायला
आता तेही नाहीत
रडून हलके करायला
तुझे कसे चाललेय
तू खुश आहेस ना??
मला अशी विसरून
तुझी तरी आहेस ना??
तू आता खुश राहा
माझा विचार करू नकोस
गेलेल्या दिवसांची
आठवण सुद्धा काढू नकोस
एकच मागणे आहे माझे
शेवटचे ते मोडू नकोस
जे माझ्यासोबत केलेस ते
कुणासोबत करू नकोस...
कुणासोबत करू नकोस...

...प्राजुन्कुश
...Prajunkush
२०.०२.२०१३.


केदार मेहेंदळे


Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir... Kay karnar ata.
... Khup abhar manapasun.