दानवीर कर्ण महान...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 06, 2013, 12:30:37 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

एक गोंडस बाळ
ज्याला सूर्याचे होते वरदान
अवतरले आईच्या पोटी
जिला नव्हता त्याचा अभिमान

जिला फक्त पहायचे होते
कसे होते मुनींचे वरदान
पण तिला त्या वरदानाचा
ठेवता आला नाही मान

तिने त्या बाळाला
जन्म तर दिला
पण त्याला सोडून
आईजातीचा अपमानच केला

जरी ती होती
लहान आणि नादान
तिला कोणी दिला होता
हक्क हा महान

त्यातूनच प्रवास सुरु झाला
त्या दुर्दैवी जीवाचा
ज्याने घडविला होता
इतिहास महाभारताचा

आई होती राजमाता
राजा होता बाप
तरीही त्याला मिळाला
ह्या जीवनाचा श्राप

पाहता पाहता राजा झाला
तरीही न्याय नाही मिळाला
जरी राजगादी मिळाली
तरी उपेक्षाच हाती आली

मृत्यूलाही जिंकले ज्याने
देऊन कुंडलांचे दान
निशस्त्र पणे मरण स्वीकारले
दानवीर कर्ण महान
दानवीर कर्ण महान...

....प्राजुन्कुश
....Prajunkush

www.facebook.com/ankush.navghare.353

Maddy_487


मिलिंद कुंभारे

छान!

दानवीर कर्ण महान
दानवीर कर्ण महान...

Khup mast chan kavita
ani KARNA ha tar maza favorite ahe tyamule tar khupach awadali

Ankush S. Navghare, Palghar


salunke


salunke



Ankush S. Navghare, Palghar


Çhèx Thakare

aaj punha athavn karun dili shivaji savantanchi vinamra abhivadan tyana  _/\_