रात्रीच्या कुट्ट अंधारांत

Started by Sadhanaa, March 07, 2013, 05:08:13 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

रात्रीच्या कुट्ट अंधारांत
   दिवस माझा उजाडतो
मनांत लपलेली सारी
   स्वप्नें तो दाखवतो
स्वप्नांची लांब  पंक्ती
   संपता संपत नाहीं
विचारांचे धावणे
   थांबता थांबत नाहीं
रंगीत तशीच रंजित
   स्वप्नें पडत असतात
दुःखी आणि निराश
   विचार येत असतात
रात्र सारी संपते परि
    स्वप्ने काहीं संपत नाहीं
विचारांच्या गतिला
   खीळ काहीं बसत नाहीं 
जीवनांतील क्षण सारे
   रात्रीच्या अंधारांत दिसतात
विचारांची भुतेही
   त्याभोवती फेरा धरतात
एकाकी पण जीवनाचे
   दिवसा पूर्ण जाळत असते
रात्रीच्या अंधारांत ते
   जास्त भयाण होत असते
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/02/sad-poem_20.html