" महिला दिना निमित्त " ............................................ /

Started by SANJAY M NIKUMBH, March 07, 2013, 09:28:07 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

" महिला दिना निमित्त "

............................................

     ///  स्री  ///



जगात

सर्वात सुंदर

स्री आहे

तिच्या इतकं सौंदर्य

अन आकर्षण

कशात आहे

तिलाच मिळालाय अधिकार

नवनिर्मितीचा

तिच्यामुळेच विस्तार

मानवजातीचा

तीच आई , तीच माया

तिच्याच ठायी , वात्सल्य ममता

ती आधार घराचा

सांभाळ करी कुटुंबाचा

सोसून वेदनांना

सडा शिंपडे आनंदाचा

नका देवी बनवून

बसवू तिला देव्हाऱ्यात

माणूस म्हणून जगू द्या

येऊ द्या जगात

तीच करते उद्धार दोन्ही कुळांचा

तिच्यावाचून पुरुष काय कामाचा

तिला हवाय आधार

प्रेमाच्या हातांचा

हक्क हवाय तिला

माणूस असण्याचा .



                          संजय एम निकुंभ , वसई

                       दि. ०७. ३. २०१३  वेळ : ९.०० रा.