वधुसंशोधन

Started by amoul, March 08, 2013, 11:59:26 PM

Previous topic - Next topic

amoul

माझ्यातही काही आहे कमी,
मलाही rejection ची आहे हमी.

कधी विरळ केस,
कधी सुटलेलं पोट,
बाकी सारं ठीक आहे,
एवढीच आहे खोट.
मुलगा तसा बराय पण,
जाड वरचा ओठ,
नावं ठेवायला जरासं,
किंचीतसं गालबोट.
स्वतःबद्दलचा अहंकार मोडायचा,
हि एक संधी नामी.

खाजवता भटोबांची दाढी,
सांगती जुळत नाही नाडी,
ग्रहांच्या दशेवर जुळवती,
संसाराची घडी.
कधी जुळत नाही रास,
कधी शनीचा त्रास,
काही तिकोनात चौकोनात,
न्याहाळती नशिबास.
कधी कारणं असतात अशी,
जी नेमकी लागतात वर्मी.

प्रत्येकाला नक्कीच,
भेटतो कुणी खास,
जो इतरांनी कधी,
केला असतो नापास.
सुटण्यासाठी फक्त,
हवा असतो एक तुरुफ,
नेमका पत्ता सापडता,
आपोआप येतो हुरूप.
कुणाची लवकर सुटते कुणाची उशिरा,
जोडीदार शोधण्याची रमी.

.....अमोल

केदार मेहेंदळे


santoshi.world