कोणा कळले नाही.....

Started by Madhura Kulkarni, March 11, 2013, 11:38:29 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

कोणा कळले नाही.....

साठलेले दुख: मनीचे,
बांधहि फुटले आसवांचे
आज मनीचे मेघ बरसले,
कोणा कळले नाही.....

डोळ्यांमधला हा ओलावा,
कसा सांग ना मी झेलावा?
पावसात त्या मी हि भिजले,
कोणा कळले नाही....

काळजातल्या त्या जखमांवर
तू च घातली  हळूच फुंकर
नकळत मी का गाली हसले,
कोणा कळले नाही......

vijay biradar


Madhura Kulkarni

धन्यवाद!

vijay biradar भाऊ,
नवीन आहेस का इथे?
(आधी कधी कॉमेंट नाही पहिली तुझी म्हणून विचारतीये.......)

Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

Prajunkush dada & केदार dada,
Thanks!

Ashwini thite



Ambarish Deshpande


Madhura Kulkarni