जीवनांतील अंधारांत ...

Started by Sadhanaa, March 12, 2013, 01:18:57 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

जीवनांतील अंधारांत
तसेच अंधार्या जीवनांत
श्रद्धेची लाविली आहे
मंद मंद फुलवात

देव दैव सर्व असती
भुकेले भक्ती भावाचे
दाद घेतील मानवांतील
निरपेक्ष त्या श्रद्धेचे

आज जरी दिसते
दैव फिदा सैतानावर
पांघरूण घातले दिसते
त्यांच्या कृष्ण कृत्यावर

सत्याला आज जरी
हाल अपेष्टा मिळतात
दु ष्त्कृत्ये आणि करुनी दुष्ट कृत्ये
सुखामध्ये जगतात

पण मिळतो स्वर्ग त्यांना
जे हाल भूवरी भोगतात
चैन करती जे भूवरी
अखेरी नरकात जातात

म्हणुनि अंधार आज जगी
सज्जनांना जरी दिसला
ह्याच अंधारातून मिळेल
वाट जाण्याची स्वर्गाला
                                     रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
https://www.blogger.com/blogger.g?blogID=6531252784105729378#editor/target=post;postID=6943646869130250957