मधाचा थेंब

Started by केदार मेहेंदळे, March 12, 2013, 01:18:28 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

मधाचा तो एक थेंब!

तो म्हणाला
त्याला  गुलाबी पाकळ्यां मधून
ओघळताना
मधाचा एक थेंब दिसला!
त्याला प्रश्न पडला
आधी मध प्राषण करावे
कि पाकळ्यांशी खेळावे!

मी म्हणालो
सोपंच आहे!
आधी मध प्राषण  कर
नंतर पाकळ्यांशी मनसोक्त खेळ!

पण मित्रा
पाकळ्या नेहमीच
टवटवीत असतील
असे नाही!
कालांतराने कदाचित
त्या  कोमेजतील!
तेव्हा मात्र विसरू नकोस;
तू प्राषण केलेला;
मधाचा तो एक थेंब!

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

मिलिंद दादा, खूप छान!

मधाचा तो एक थेंब तो गेला चाखून...
पण केला मात्र गेलाय तो आता कडवट करून.....

milind kumbhare

मधुरा ताई
काय लिहावे सुचत नाही!

ही चारोळी खरी तर केदार दादांची!
त्यात मी जोडलेल्या फक्त चार ओळी!

मधाचा गुणधर्मच जणू;
गोडवा वाटण्याचा!
प्रत्येकांनी हवा तसा तो चाखावा!

तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे




केदार मेहेंदळे

मिलिंद आणि मधुरा
छान लिहिल. इतकच म्हणीन......

हि माझ्या शब्दांची नाही
तीच्या सौंदर्याची जादू आहे
शब्द तर साधेच आहेत पण
भावना  मात्र अस्सल आहेत. 

अजीब हि कश्मकश आहे
मधाचा थेंब जितका गोड
पाकळ्या हि तितक्याच
रसरशीत आहेत...................  :) ;) :)


केदार..............