* ती स्रीच होती अन आहे ........

Started by SANJAY M NIKUMBH, March 12, 2013, 08:25:51 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

 * ती स्रीच होती अन आहे ........



तिने गर्भात मला वाढवलं

तिच्या अन्न पाण्यावर जगवलं

फक्त जाणीव माझ्या अस्तित्वाची

माझं रूप , रंग न बघता

मला फुलासारखं जपलं

ती स्रीच होती ..........

नऊ महिने नऊ दिवस

पोटात वाढवल्यावर

असंख्य  वेदनांना सामोरं जात

तिने हे जग दाखवलं

मी दिसताच वेदना विसरून

मला छातीशी कवटाळलं

माझ्या भुकेची जाणीव होताच

जिने अंगावरच दुध पाजलं

ती स्रीच होती ..........

मला वाढवतांना

तिनं पहिला घास भरवला

दुडू दुडू रांगतांना मागे मागे धावून

मी खावं म्हणून

जी स्वतःची तहानभूक विसरून

माझं हागणं - मुतनं आनंदान करत होती

ती स्रीच होती ..........

चालायला लागल्यावरही

अन मोठा झाल्यावरही

फक्त माझ्या काळजीनं

जिचं उर भरून येत होतं

मला भूक लागल्यावर

ती लहान असूनही

काहीतरी करून खाऊ घालत होती

ती माझी बहिणही

ती स्रीच होती ..........

मला मुलं झाल्यावरही

जी माझी काळजी करते

घरातल्या तीन पुरुषांच

उदर भरण ती करते

माझी पत्नी अन प्रेयसी होऊन

जिन माझं जगणं तिच्या प्रेमानं

बेधुंद करून टाकलंय

तीही स्रीच आहे

स्री आहे म्हणून

नर अन संसार आहे

मानव जातीच्या उद्धारासाठी

तिचीही तितकीच नव्हे तर

जास्त गरज आहे .



                                    संजय एम निकुंभ , वसई

                                 दि. ०८.०३.१३ वेळ : १०.३० स.















Madhura Kulkarni

वाह! अस काही तरी पुरुषांनी 'स्त्री'ची स्तुती केली किंव्हा तिच्या कार्याबद्दल कृतज्ञता दाखवली कि छान वाटत.