काळरात्र

Started by मिलिंद कुंभारे, March 13, 2013, 04:27:50 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


काळरात्र

स्वप्नी मी असा रंगलेला!
रात्र ती काळोखी!
वाट ती अंधारलेली!
ध्येयवेडा मी!
घेतली स्वैरभरारी!

तुटलेल्या पंखांची
जेव्ह्या जाण झाली;
तेव्ह्या
हळूच जाग आली!
भांबावलेल्या नयनांना!
उष:कालाची
प्रतीक्षा होती!

पण छे!
काळरात्रच होती ती!

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

मुक्तछंद न हा?
मस्त.

milind kumbhare

मधुरा ताई
कुठला छंद आहे माहित नाही!
पण माझ्या मनीचा एक भाव नक्कीच आहे!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे

मिलिंद छान लिहिलस. थोडं माझ हि......


त्या काळ रात्रीच्या उदरी
परंतु......................
फुलली पहाट होती

घेतलेल्या स्वैर भरारीची
मज
प्रतीक्षा होती........

क्षितिजावर तेंव्हा फुलली
ती
स्वप्नील पहाट होती

कसं वाटलं?

केदार......

मिलिंद कुंभारे

मित्रा 
कळत नाही
सुचतात तुला
कश्या पटकन ओळी!

खूपच छान  प्रतिसाद आहे!

माणसाच्या आयुष्यात जर काळरात्र असेल
तर त्याच्या आयुष्यात आलेली
ती पहाटही खूपच भरभरून फुललेली असते!
हे माझे अनुभवाचे बोल आहे!

तुझ्या चारोळी मधून मला सुचलेली
ही एक चारोळी!
बघ तुला आवडते का?

उधाणलेला सागर

तिच्या निळ्याशार डोळ्यांत मी
उधाणलेला सागर बघितला!
कळत नाही;
त्या लाटांवर मी अलगद तरंगू!
कि खोलवर जाऊन त्याची पातळी गाठू!

मिलिंद कुंभारे

Madhura Kulkarni

मिलिंद,

तू मला ताई म्हणालास तर मी तुला मिलिंद अस म्हणालास तर चालेल न बहिण या नात्याने? याला तुझी हरकत नसावी....
मला मुक्तछंद भयंकर आवडतो...
आता माझ्या ओळी......


प्रत्येक कळीत असत
एक न उमललेलं फुल.....
आणि
प्रत्येक सूर्यफुलाच्या कळीला वाट पहावीच लागते....
रात्र सरून चंद्राऐवजी सूर्य नभी येण्याची.....
कारण...............
वेळ हेच प्रत्येक प्रश्नाच उत्तर असत!

मिलिंद कुंभारे

मधुरा
काहीच हरकत नाही!
तू मला दादा म्हणाली!
तर मी तुला
का म्हणू नये ताई!

आता तुझ्या ओळींना प्रतिसाद-
खूप छान लिहितेस तू!

प्रत्येक कळीला उमलायचंच असते;
अन सूर्याला आशेच्या किरणांची;
उधळण करीत;
रोज नित्याने उदयाला यायचेच असते!
प्रत्येकाच्याच आयुष्यात एक काळरात्र असते!
तशीच एक रम्य पहाटही असतेच!

मिलिंद कुंभारे