माणसे

Started by Tushar Kher, March 13, 2013, 10:18:51 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

मोठ्या शहरातील माणसे
बिन चहेऱ्या  ची माणसे

अर्था  शिवायच्या गर्दीत
कारणा शिवायची माणसे

अनोळखी वाटतात मला
माझ्या च घरातील  माणसे

दुसर्याला धडा शिकवणारी
हि सारी असिक्षित माणसे

भोळी भाभडी दिसणारी
हि कपटी लुच्ची माणसे

माणुसकी ला विसरलेली
हि सर्व निर्लज्ज माणसे

देवाला हि फसवणारी
स्वार्थांध भक्त माणसे



तुषार खेर

केदार मेहेंदळे

छान कविता तुषार जी. मला सुचलेलं खाली लिहिलं आहे.


या बिन चेहऱ्याच्या माणसामध्ये
मी आपलं माणूस शोधतो
अन घरातल्या आरशात स्वतःचच
प्रतिबिंब मी बघतो.....

आरशातल्या प्रतीबिंबात
एक अनोळखी कुणी दिसतो
आरशातल्या प्रतीबिंबात 
मी स्वतःलाच शोधतो

केदार.....