तुझ्या माझ्या प्रेमाच्या

Started by Sadhanaa, March 15, 2013, 02:42:11 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

तुझ्या माझ्या प्रेमाच्या
आठवणी मनांत येत आहेत
परंतु भित्र्या सशा परि
भरकन पळून जात आहेत
आपण दोघें मिळून वाटले
जीवनीं स्वर्ग निर्मावा
आदर्श पति-पत्नी म्हणून
संसार आपला गौरवावा
तूं ही माझ्या विचाराला
साथ दिली मनापासून
छोट्या संसारात आपुल्या
सुख समाधानाने राहून
विवेकाने वागून आपण
एकमेका समजून घेतले
देतां येईल तितके अन
मुक्त हस्ते सुख दिले
निर्मळ अपुल्या संसाराला
दृष्ट कुणाची तरी लागली
भरला संसार उधळून
तूं माझी साथ सोडली
कां झाले दैव इतुके
कठोर ते माझ्यावर
आणला प्रसंग त्याने
येऊ नये जो वैर्यावर
आता फक्त आठवणी
मनांत उद्भवत आहेत
जखमी सश्या प्रमाणे
मनांत रेंगाळल्या आहेत

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/03/love-poem_7.html

मिलिंद कुंभारे


आठवणी असतात नेहमी जपायच्या!
कधी असतात त्या कडवट!
तर कधी असतात त्या गोड!
आपण मात्र त्यातला कडवटपणा
विसरून जावा!
गोडवा तेवडा मनाशी जपत राहावा!

खूप छान!
मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे