नातं

Started by मिलिंद कुंभारे, March 15, 2013, 02:02:40 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

नातं

नाती असतातच अशी!
कधी वाटतात ती ओझी!
तर कधी वाटतात ती हवीहवीशी!

नात्यांत  - नातं
असतं एक नातं;
आई अन मुलाचं!
त्या चिमुरड्याला;
आई जपते सदैव;
तळहातावरच्या फोडासारखं !
कुशीत तिच्या
मिळते त्याला;
कधी प्रेमाची ऊब
तर कधी;
मायेची उशी!
तिने रोज गायलेली
अंगाई ऐकत-ऐकत
तो केव्हा गाठतो
तारुण्यरेषा;
तिला कधी ते कळतंच नाही!

आता त्याला मिळते एक सखी;
डोळ्यांवर त्याच्या चढते धुंदी;
अन दृष्टिआड होते;
मायेची ती उशी!

आता सैल होतं एक नातं;
अन घट्ट जुळतं  दुसरं  नातं !
आता एक नातं  असतं  ओझं;
तर दुसरं नातं वाटत हवं-हवंस!

मिलिंद कुंभारे

arundhatigunjkar

        KAVITA VASTWIK PARISTITLA DHARUN AAHE PAN YAT PARIVARTAN GHADWANE MULACHAYA HATAT AAHE TYANE DONHI NATE JAPALECH PAHIJE

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

केदार दादा धन्यवाद! :)

अरुंधती ताई, तुम्ही म्हणता तसे बरोबर आहे, पण बहुतेक असे होत नाही हीच खंत आहे! :( :( :(

sweetsunita66

पण तिच्या मायेची सावली  कधी पारखी होत नसते ,
कारण तो तिच्या साठी नेहमीच अल्लड बाबल्या असते .
        छान ,मस्त कविता !!!!!

मिलिंद कुंभारे


sweetsunita

अगदी बरोबर आहे!!!! :) :) :)

धन्यवाद!

प्रशांत नागरगोजे

ek mulgi ji pudhe chalun AAI honar ahe tich TYALA AAI-BAPA  pasun dur karate.....tari apan mhanato "Stri mahan ahe"

sweetsunita66

                      अनिरुद्ध...............  :) तू तरी शहाण्या मुलासारखा कुडियो [मुलींपासून ]दूर राहा म्हणजे कमावलं । मुलांची अक्कल काय गहाण असते काय ?ok  its all right ...................

मिलिंद कुंभारे

#8
प्रशांत!
खरे आहे ...
पण जेव्हा ती आई होते तेव्हा ती आपल्या पिल्याला कधीच दूर करत नाहि......

अरे नाती अशीच असतात ...... गुंतागुंतीची .......
कळतच नाही कधी, केव्हा कुठल्या वळणावर आपली साथ देतील, कधी साथ सोडतील ......
आपण त्यात म्हणून जास्तच गुंतू नये, त्रास शेवटी आपल्यालाच होतो .........

don't worry! Be happy!!!! :) :) :)

sweetsunita66

प्रशांत................ तू तरी शहाण्या मुलासारखा कुडियो [मुलींपासून ]दूर राहा म्हणजे कमावलं । मुलांची अक्कल काय गहाण असते काय ?ok  its all right ...................