माझ्या मनातील गाव

Started by kuldeep p, March 16, 2013, 03:26:55 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

वरयाची एक झुळूक कानात काहीतरी बोलून गेली
आपल्या अस्तित्वाची जणू जाणीव करून गेली
नकळत तुझी आठवण मनात दाटून गेली
वाळवंटात जणू पावसाची सर बरसून गेली
मनात कोरलेल्या त्या क्षणांना उजाळा देऊन गेली
मातीत मेलेल्या त्या तनांना एक बहार देऊन गेली
एक नशा होती त्या हवेत
एक कसक होती तुझ्या आठवणीत
वाहत गेलो त्या हवेच्या झोकात
तुझ्या त्या आठवणींच्या प्रवाहात 
कधी नव्हे ते असे झाले होते
माझ्या मनातील गाव तुझ्या आठवनींने बहरले होते
माझ्या मनातील गाव तुझ्या आठवनींने बहरले होते


kuldeep p


Ankush S. Navghare, Palghar


kuldeep p


मिलिंद कुंभारे