मुक्तछंद.....

Started by Madhura Kulkarni, March 18, 2013, 02:43:51 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

तीळतीळ तुटे जीव
नदीपल्याड नाव गेली
गाव सोडुनिया सारा
सखा माझा दूर दूर
आला भावनांचा पूर...
पापण्या पाणावल्या
दुख दाटले ग उरी
उफाळून येती कश्या
आठवणी या सागरी...
संथ वाही वारा,
गंध प्रीतीचा लेवून.....
तुजला भेटण्याचा
ध्यास मनात घेऊन....
सूर्य अस्ताला आलेला
आभाळ केशरी-तपकिरी..
नदीचे हि पाणी
भासे सोनेरी-सोनेरी....
आसमंतात भरला
कुठलासा हा गारवा..
हिरवळीचाहि स्पर्श कसा
बघ हिरवा-हिरवा.....
पण तरीही उदास
सारे-सारेच भकास
तुझीच रे आस लागली मनाला.......

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni

धन्यवाद दादा.

मिलिंद कुंभारे

सूर्य अस्ताला आलेला?

सूर्य अस्ताला गेलेला?

खूपच छान आहे!

मिलिंद कुंभारे!

Madhura Kulkarni


Ganesh Naidu


Madhura Kulkarni

गणेश,
धन्यवाद!