समुद्र..

Started by Rohit Dhage, March 19, 2013, 12:12:15 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

माझ्या डोळ्यात उसळणाऱ्या, तुला पाहून झेप घेणाऱ्या लाटा
पाषाणरूपी हृदयावर जाऊन कोसळणाऱ्या, फक्त फेसाळणाऱ्या लाटा
हजार वेळा आपटणाऱ्या, क्षणाक्षणाला फसलेल्या लाटा..
आवाज.. फक्त आवाज काही होत नाही
पाणी मात्र खळखळत राहतं..
आतल्या आत जिरत राहतं.. आनंदलेल्या जमिनीवर
काहूर आणतं माझ्या असण्यावरच..
माझा फक्त प्रयत्नच असतो दर वेळी,
ओली जमीन वाचवण्याचा.. जमेल तेवढी.. जमेल तशी
आणि मग उगाचच होते.. दरवेळची वेडगळ.. दरवेळची
दर वेळी हे असंच होतं.. जेव्हा तुझं दिसणं होतं..

- रोहित

मिलिंद कुंभारे

खूपच छान! :) :) :) :) :)

मिलिंद कुंभारे

Rohit Dhage


केदार मेहेंदळे


Rohit Dhage


केदार मेहेंदळे

prem kavita udas vatali
asahyy dilachi agatikata vatali :(

Rohit Dhage

its ok buddy.. let her go.. chillax  8)