जे.कृष्णमूर्ती,पाडगावकर, कविता

Started by विक्रांत, March 19, 2013, 05:05:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

जे.कृष्णमूर्तीच्या पुस्तकात
एकदा मला पाडगावकरांची
कविता सापडली .
तेव्हा पासून मी
पाडगावकरांची कविताच
वाचू लागलो .
वाचता वाचता एक दिवस
तिथे मला पुन्हा
जे.कृष्णमुर्ती भेटले
आणि म्हणाले
" कळले का ,
मी म्हटले होते ते ?
लिहलेली कविताच
फक्त कविता नसते!"
मी पाडगावकरही 
ठेवून दिले.
कारण,
अचानक मला
शब्दात नसलेली कविता
कळू लागली होती .

विक्रांत प्रभाकर