-------- क्षण वैरागी ------------

Started by Ambarish Deshpande, March 19, 2013, 08:21:08 PM

Previous topic - Next topic

Ambarish Deshpande

क्षण वैरागी मनही जोगी तरी स्वप्नांचा मोह सुटेना
क्षितीजामागे मावळतांना तेजाची आरास विझेना

भास कुणाचे असे छेडती, जपलेली अधुरिशी नाती
गाव मनाचे राहून गेले, मागे सरल्या वाटेवरती
चुकले थकले प्रवास सारे, तरी पावले कुणा शोधती
हरलो आता  स्वत:शी मी, अस्तित्वाचा लेश उरेना

बंद पापणी पुन्हा शोधते, क्षण काही माझे-माझेसे
स्वप्नांच्या उरल्या राखेतून, गीत तुझे अधुरे उरलेसे 
दाटून आले, आठव ओले, आतून काही गहिवरलेसे
कितीच गाणी आयुष्याची, गातो मी परि सूर मिळेना
 

अंबरीष देशपांडे

मिलिंद कुंभारे

गाव मनातले  राहून गेले, मागे सरल्या वाटेवरती! :-\

कित्येक गाणी आयुष्याची, गातो मी परि सूर मिळेना! :-\

कविता खूपच छान आहे!
मिलिंद कुंभारे  :) :) :)

केदार मेहेंदळे


Ambarish Deshpande

मिलिंद कुंभारे: आपण सुचावलेले बदल केल्यास गाण्याचे मिटर हलते आहे. क्षमस्व !!
धन्यवाद !!

shashaank


विक्रांत

मिटर हे या कवितेचे बाल स्थान आहे .मस्त वाटते गातांना .शेवटी ' कितीच गाणी 'वर थोडे ठेचाळल्या सारखे होते.