चोर-बाजार शब्दांचा!

Started by मिलिंद कुंभारे, March 20, 2013, 01:24:35 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

चोर-बाजार शब्दांचा!

का मांडतोस तू;
चोर-बाजार शब्दांचा!
अन करतोस उपहास;
तिच्या माझ्या भावनांचा!

कधी कॉपी पेस्ट करून;
चोरोतोस तू;
त्याचं गुलाबी स्वप्नं!
तर कधी तिचं गोड हसणं!

तसंच कॉपी पेस्ट करून;
भरशील का तू;
तिच्या रिकाम्या घागरीत;
नभातल चांदणं!
होतील का
तिच्या डोळ्यांतील
अश्रूंची फुलं!
अन
उकलशील का?
जन्म अन मृत्यू मधलं;
अंतर एका श्वासाचं !

मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

केदार दादा!
हा माझा कॉपी पेस्ट चोरांना समजावण्याचा एक प्रयत्न आहे!
बघूया किती यश मिळते तर!
धन्यवाद!  :)