------- माधवाच्या बासरीचे ---------

Started by Ambarish Deshpande, March 20, 2013, 07:54:07 PM

Previous topic - Next topic

Ambarish Deshpande

श्रावणाचा सूर वेडा
गाई सरीतून गाणे

माधवाच्या बासरीचे

नभ छेडती तराणे


चिंब झाली रानराई

मेघ ओंजळीत आले

झरे कपारी भरून

सूर होवुनी निघाले

वारा पानाशी खेळतो

खेळ कोणता नव्याने


माती ओलावा धरून

गंध वाहतो मोहतो

दरीतून गवताची

गर्द शाल पांघरतो

रूप मायावी देखणे

फिटे डोळ्याचे पारणे


माधवाच्या बासरीचे

नभ छेडती तराणे



अंबरीष देशपांडे 

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

चिंब झाली रानराई
मेघ ओंजळीत आले

वारा पानाशी खेळतो
खेळ कोणता नव्याने

छान! आवडली! :) :) :)

DHANASHRI HARSHVARDHAN

TUZA AATHVANINE MI HASVAT ASTE MAZE MAN

TUZYA ATHVANINECH JAGAT ASTE ME MAZA PRATYEK KSHAN

MANAT TU BOLLELYA SHABDANCHI KARAT ASTE SATHVAN

PAN MANAT FAKT ASTE TUZICH AATHVAN TUZICH ATHVAN TUZICH AATHVAN

rudra



sweetsunita66

श्रावणाचा सूर वेडा
गाई सरीतून गाणे
माधवाच्या बासरीचे
नभ छेडती तराणे.........
:) :) :)वाह मस्तं

vijaya kelkar

   छान अष्टाक्षरी ....(नावासहीत--स्वत:चे आणि कवितेचे )..