मस्त कलंदर

Started by Vikas Vilas Deo, March 23, 2013, 10:05:16 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

अन अचानक पालटुन गेले
सारेच वातावरण
पळू लागले सैरावैरा
शोधात निवाऱ्‍याच्या सारेजण

मैफिल जमली काळ्याभोर ढगांची
निळ्याशार आकाशात
गडगड गरजू लागले
जणू भैरवी आहेत गात

नाल्या तुटूंब भरल्या
वाहू लागल्या वरुणी
रस्ते सारे न्हाऊन गेले
गेले पाण्याने भरुणी

चिंब झाली धरती सारी
भिजूनी गेले दगड, धोंडे,पर्वत,डोंगर
निवाऱ्‍याच्या शोधात भटकू लागली
गाई ढोरे गुरे वासरे

पण आम्ही चाललो भिजत पावसातून
ना शोधले कडे
कोणी म्हणती मस्त कलंदर
कोणी म्हणतसे वेडे