जा जा निघून जा मी माफ केले तुला ........

Started by tejam.sunil@yahoo.com, March 24, 2013, 11:49:11 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com



......:- गझल :- .............

जा निघून तू ,केले माफ तुला
जीव माझा इवलासा दिला दान तुला

कर त्याचे काहीही पुन्हा मागणार नाही मला
रडतं असतो सारखा जर समजून संग त्याला

स्वभाव काय सांगू ओंजळीत ठेव त्याला
भास सारखा होतो न आठवत राहतो तो तुला

मन खूप मोठे आहे थोड समजून घे त्याला
ओजाळीतल्या ओल्याव्यासारखे जपले आहे मी त्याला

जपून कर वार थोडे घाव पडेल त्याला
असह्य अशा वेदना दिसणार नाही तुला

त्याच्या नशिबात काही नाही पण घडव थोड त्याला
रख रख त्या उन्हासारखे जळतो तो स्वतः

घेऊन जा सारे काही पण उरणार काय मला
एकांतात राहण्यापेक्षा जाळून टाक या देहाला

फुल आणून थोडीशी उचल मुठीत राखेला
कवटाळून हृदयाशी आता तरी बोल मी मानल रे तुला

@ सुनिल ( माझा एकांत आणि मी.)


Ankush S. Navghare, Palghar